रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न...
जालना
भोकरदन:भोकरदन शहरात रोहित शर्मा मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संतोष पाटील दानवे यांना फेटा बांधून शाल श्रीफळ आणि श्रीरामाची मुर्ती भेट देवून तर आ.संजनाताई जाधव यांना फेटा बांधून,शाल,श्रीफळ आणि श्रीरामाची मुर्ती आणि साडी भेट देवून ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते सुरेश शर्मा, मा.नगरसेविका संध्याताई शर्मा, रोहित शर्मा, प्रिती शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ.संतोष पा.दानवे,आ. संजना ताई जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून जेष्ठ भाजपा कार्यकर्ते सुरेश शर्मा, रोहित शर्मा मित्र मंडळ यांचे आभार मानले. यावेळी भास्कर आबा दानवे,भूषण शर्मा,मनीष श्रीवास्तव,नानासाहेब वानखेडे यांच्या सह भोकरदन शहरातील नागरिक,महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment