Live News, व्हिडीओ, चालू घडामोडी, शेतकरी, अन्याय अत्याचार वाचा फोडणारे एकमेव चैनल
Monday, December 23, 2024
पाणीपट्टी नगर परिषद ने माफ करावीआम आदमी पार्टी भोकरदन ची मागणी
Saturday, December 21, 2024
भोकरदन येथे वंचितच्या वतीने अमित शहा विरुद्ध जोडे मारो आंदोलन
भोकरदन (प्रतिनिधी)केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी संसदेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना अपशब्द वापरात अपमान केला.त्याचा निषेध म्हणून भोकरदन येथे शनिवारी 21 रोजी रमाई नगर,नवे भोकरदन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अमित शाह यांचा निषेध करत त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.
दरम्यान, यावेळी तहसीलदार भोकरदन मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे संसदेत केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरून अपमान केला आहे. यामुळे आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट आहे. लोकशाही च्या मंदिरात संविधान निर्मात्याला हा कमी लेखण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला आहे. त्यांचे वक्तव्य हे संविधानिक पदालाअनुसरून नसून त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही शेवटी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ,मंगेश पगारे,नितीन म्हस्के,सिद्धार्थ सोनवणे,सागर साळवे,अमोल भोंडे,ज्ञानेश्वर शेजूळ,कृष्णा निकाळजे, विजय पगारे,निलेश हिवाळे,नितेश सावंत,गौतम वाके कर, यशोदीप राऊत,अभिजित गायकवाड, नितीन जोगदंडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कॅन, टाकीत डिझेल द्या; भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी
भोकरदन (प्रतिनिधी): आगामी खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले डिझेल कॅन, टाकी किंवा ...
-
भोकरदन (प्रतिनिधी): आगामी खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले डिझेल कॅन, टाकी किंवा ...
-
रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न... ...
-
प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....
