Wednesday, March 5, 2025

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम


प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे. यावर्षी बऱ्याचशा शाळेमध्ये विद्यार्थी ,शिक्षक,लोकसहभाग,पोषण आहार शिजवणारे कर्मचारी,पालक यांच्या सहकार्यातून परसबाग निर्मिती करण्यात आलेली आहे .त्यातील भाजीपाला व तृणधान्य हे शालेय पोषण आहारामध्ये वापरले जात आहे. पालक विद्यार्थी यांना विविध पाककृतींची व तृण धान्याची माहिती व्हावी या उद्देशाने  आज दिनांक 05/03/2025 रोजी तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा ठेवण्यात आली होती. पाककृतीचे निकष पुढीलप्रमाणे होते, फोर्टी फाईड तांदळाचा वापर व महत्व ,तृणधान्याचे महत्व व वापर, दैनंदिन आहारातील उपयोग, चव, मांडणी व नाविन्यपूर्णता इत्यादी. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व १७ केंद्रातील पोषण आहार शिजवणारे कर्मचारी सहभागी होते. त्यापैकी केंद्र जवखेडा बु अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुनगर हसनाबाद या शाळेचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक केंद्र बरंजळा साबळे,तृतीय क्रमांक केंद्र कन्या भोकरदन यांना मिळाला.  शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्पर्धक श्रीमती सुमनबाई प्रकाश रामफळे व श्रीमती सुनिताबाई शंकर तुपे यांचा गटशिक्षणाधिकारी श्री शहागडकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री यशवंत जोशी सरांनी विशेष अभिनंदन केले.या पाककृती यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री लेंभे सर , श्री साळवे सर, श्री सरकटे सर ,श्री वाढेकर सर,श्री माहोरे सर ,श्री चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....