भोकरदन शहरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या...
कमलकिशोर जोगदंडे
भोकरदन शहरातील रमाई नगर येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 18 सप्टेंबर 2024बुधवार रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
![]() |
मयत धम्मपाल केशवराव पगारे |
धम्मपाल केशवराव पगारे वय 40 रा. रमाई नगर नवे भोकरदन तालुका भोकरदन जि. जालना असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धम्मपाल पगारे या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे नातेवाईकांना आढळून आल्याने तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी दाखल केले असता डॉक्टर तपासून मृत्य घोषित केले.मृत्यदेह वर शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून भोकरदन येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्यात आई, एक भाऊ, पत्नी, 3बहिणी असा परिवार आहे.
दरम्यान,तरुणाच्या आत्महत्या करण्याचे कारण अध्यपही कळू शकले नाही. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून नोंद घेतली आहे.
No comments:
Post a Comment