Tuesday, September 24, 2024

भोकरदन विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यासाठी प्रयत्न करणार डाॅ.पी.सी.शर्मा


भोकरदन
(प्रतिनीधी) आगामी निवडणुकीत भोकरदन विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडवून घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा मध्यप्रदेशचे माजी मंत्री डॉ. पी. सी. शर्मा यांनी येथे बोलतांना दिली. महाराष्ट्र राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुक तयारीचा आढावा घेण्यासाठी जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा मध्यप्रदेशचे माजी मंञी डाॅ. पी. सी. शर्मा हे काल रविवारी जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. भोकरदन येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.जालना व परभणी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी इंडिया (महाविकास) आघाडीचे उमेदवार खा.डाॅ कल्याणराव काळे जालना, व खा. बंडु जाधव, परभणी यांना भरघोस मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल पी.सी.शर्मा यांनी सर्वप्रथम सर्व जनतेचे, व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.भोकरदनचे स्थानिक उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांचा दबाव झुगारून भोकरदन- जाफराबाद तालुक्यातील जनतेने त्यांचा दारून पराभव करण्यात मोठा वाटा उचलला त्याबद्दल या दोन्ही तालुक्यातील जनतेचे देखील विशेष आभार व्यक्त करून आगामी विधानसभा निवडणुकीत भोकरदनची जागा काँग्रेस पक्षाला कशी सोडता येईल यासाठी आपण केंद्र व राज्यातील पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करून ही जागा काँग्रेसला सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शर्मा यांनी यावेळी दिली. बैठकीच्या प्रारंभी निरीक्षक शर्मा यांनी जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ निहाय आढावा घेतला. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी लोकसभा निवडणूक २०२४ आणि विधानसभा निवडणुक २०१९ मधील जालना जिल्ह्यातील विधानसभा निहाय लेखी अहवाल जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान सपकाळ यांनी केले तर आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी मानले. यावेळी अनुसूचित सेलचे राष्ट्रीय पदाधिकारी जयप्रकाश नारनवरे, युवक काँग्रेसचे राहुल पाटील, ओबीसी सेलचे पंकज वाळेकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद,वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, शेख रिझवान, बदनापूर तालुकाध्यक्ष सुभाष मगरे, भोकरदन तालुकाध्यक्ष ञिबंकराव पाबळे, अनिल देशपांडे, श्रावण आक्से, इंद्रजीत देशमुख, माजी नगरसेवक शेख रफीकोदिन, संतोष अन्नदाते, रमेश जाधव, दादाराव देशमुख, विश्वासराव वाघ, गुडु कादरी,रईस शेख, अजीज पार्टी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांची या बैठकीस उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....