Friday, January 17, 2025

देशासह विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचे सदस्यत्व स्विकारुन भारतीय जनता पार्टीला पाठबळ द्या - माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे


देशासह विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचे सदस्यत्व स्विकारुन भारतीय जनता पार्टीला पाठबळ द्या - माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे
भोकरदन दि. 17
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील विकसीत भारत व मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वप्नातील विकसीत महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारुन भारतीय जनता पार्टीला पाठबळ द्यावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील सोयगांव देवी येथे शुक्रवार दि. 17 जानेवारी 2024 रोजी भाजपा सदस्य नोंदणी संघटन पर्व अंतर्गंत घर चलो अभियानात केले. यावेळी मा. जि.प.सदस्य डाॅ.चंद्रकांत साबळे, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाराव महाराज राऊत यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गंत भोकरदन तालुक्यात शुक्रवार दि. 17 जानेवारी 2024 रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियाना अंतर्गंत माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी सहभागी होत ग्रामस्थांची आॅनलाईन पध्दतीने भाजपाचे प्राथमिक सदस्य म्हणुन नोंद करुन घेतली. भोकरदन तालुक्यातील सर्व गावामध्ये भाजपाचे घर चलो अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले असुन स्थानिक पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांनी या अभियाना अंतर्गंत नोंदणी केली. सदर अभियानास नागरीकांचा मोठा प्रतिसाद लाभला असुन हे अभियान यशस्वी करण्यासाठी गणेशबापु फुके, कौतीकराव जगताप, राजेंद्र देशमुख, आशाताई पांडे, तुकाराम जाधव, मुकेश चिने, गणेश पा.ठाले, परमेश्वर लोखंडे, मधुकर दानवे, दिपक जाधव कमलाकर साबळे, गजानन नागवे, मधुकर मुकुटराव, गजानन गावंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.  


No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....