Friday, January 17, 2025

निनाद देशपांडे याची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड.

निनाद देशपांडे याची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड.
भोकरदन येथील श्री मोरेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी निनाद रवींद्र देशपांडे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालय स्पर्धेमध्ये "वूशू"या ऑलम्पिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची पंजाब येथे होणाऱ्या देशपातळीवरील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात गुरुवार 16 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 
आतर महाविद्यालयीन." वूशु.."
खेळाच्या (मुले आणि मुली) स्पर्धा घेण्यात आल्या. 
या स्पर्धेत भोकरदन येथील श्री मोरेश्वर महाविद्यालयातील 
खेळाडू " निनाद रवींद्र देशपांडे"
90 किलो वजन गटात वुशु या ऑलम्पिक क्रीडा प्रकारातील  खेळात प्रथम येऊन गोल्ड मेडल मिळवून त्याची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी  विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
  त्याबद्दल त्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ,भगवान डोंगरे, उपप्राचार्य डॉ. गोवर्धन मुळक, क्रीडा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ रोकडे, डॉ.रघुनाथ सपकाळ, डॉ. विश्वंभर तनपुरे, महाविद्यालयाच्या क्रीडा मंडळाचे सदस्य,  डॉ. शिवाजी सांगळे, डॉ. कविता वळवी  या सर्वांनी महाविद्यालयाचें वतीने त्याचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....