जालना:भोकरदन येथे आज सकाळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशोका बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तिस पुष्प वाहून आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तिस पुष्प हार अर्पण करून सहमुहिक बुद्ध वंदना घेवून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थिति होती.त्यानंतर रमाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून सहमुहिक बुद्ध वंदना घेवून अभिवादन करून श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन अभियानाला भोकरदन शहरातील नागरिकांच्या वतीने मोठा प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात वही,पेन दान दिले आहेत. दरम्यान,रमाई नगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळयाला आ. संतोष दानवेंच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सतिश बापू रोकडे,जयवंत साबळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति सचिव सचिन पारखे,पत्रकार सुरेश बनकर,प्रदिप जोगदंडे, वंचित बहुजन आघाडी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष विशाल मिसाळ,जय भीम सेनेचे शामराव दांडगे, मंगेश पगारे,दिपक बोर्डे,माजी पं.स.सदस्य ऋषिकेश पगारे,बाबुराव पगारे, प्रा. टी. आर कांबळे,गंगाधर कांबळे, माजी सरपंच राजू निकाळजे,विजय मिरकर,श्रीरंग भवर,बळीराम ठाले, दादाराव कलम,युवराज पगारे,नितिन बोर्डे,शेख रईस, राजू जाधव, प्रवीण आढावे,सुमित हिवराले,रवि पगारे,का. मा. पगारे,रमन पगारे यांच्या सह महिला,पुरुष सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती.
छायाचित्र:कमलकिशोर जोगदंडे,भोकरदन
No comments:
Post a Comment