Sunday, August 20, 2023

आगामी लोकसभा, विधानसभा आणि जि.प. व पं.स निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मरगळ झटकुण कामाला लागवे - भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे

भोकरदन दि. 20

आगामी लोकसभा, विधानसभा आणि जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकत्यानी मरगळ झटकुण कामाला लागावे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी भोकरदन येथे रविवार दि. 20/08/2023 रोजी भारतीय जनता पार्टी भोकरदन तालुका पदाधिकारी आढावा बैठकीत बोलतांना केले. यावेळी भाजपा प्रदेशउपाध्यक्ष व जालना लोकसभा प्रभारी एजाजभाई देशमुख, जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे, भाजपा जिल्हा सरचिटीस (संघटन) सिध्दीविनायक मुळे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, कृ.उ.बा.समिती भोकरदनचे सभापती कौतीकराव पा.जगताप, भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपक पा.जाधव, भाजपा शहराध्यक्ष सतिषबापु रोकडे, भाजयुमो शहराध्यक्ष दिपक पा.मोरे, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष भगवान गिरणारे, जि.प.सदस्य विठ्ठलराव चिंचपुरे, जि.प.सदस्य डाॅ.चंद्रकांत साबळे, जि.प.सदस्य शिवाजी सपकाळ, कृ.उ.बा.समिती संचालक नंदकुमार गिर्हे, सुभाष जंजाळ, समाधान शेरकर, लक्ष्मण मळेकर, गणेश ठाले, सुखलाल बोडखे, भागवत पोटे, अनिल राऊत, पं.स.सदस्य ऋषिकेश पगारे, संतोष वाघ, बी.एन.कड, सांडु पा. वाघ, विजय कड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष पठाडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी लोकसभा, विधानसभा, नगर परिषदा आणि जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकार व राज्यसरकारचे ऐतिहासिक निर्णय, कल्याणकारी योजना आणि विकास कामे तळगाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी कार्यकत्यानी  मरगळ झटकुन ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतुन प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी कामाला लागावे असे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



सदर बैठकीमध्ये भाजपा प्रदेशउपाध्यक्ष व जालना लोकसभा प्रभारी एजाजभाई देशमुख, जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांनी पदाधिकाÚयांना संबोधित केले. तरी आभार प्रदर्शन नंदकुमार गिर्हे यांनी केले. यावेळी परमेश्वर लोखंडे, राजु खंडाळकर, सर्जेराव पा.बरडे, नितीन देवकर, कैलास पवार, उत्तमराव शिंदे,  बाळासाहेब शिंदे, कैलास बोडखे, गजानन वाघ, संतोष रोकडे, जयवंता लोखंडे, रामराव दळवी, पंजाबराव देशमुख, अंबादास साबळे, सुभाष जाधव, शे.कयुम, कैलास हजारी, कैलास बडक, डाॅ.प्रमोद कुलकर्णी, एकबाल पठाण, विनोद मिरकर, प्रकाश गिरणारे, संजय दाभाडे, जनार्धन गाडेकर, राजु निकाळजे, अंकुश बडक, सुनिल सोनुने, श्रीरंग भवर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....