शिक्षकांच्या रिक्त जागा भरा,शिक्षकांना शिकवू द्या,अशैक्षणिक कामासाठी केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करून शाळाबाह्य कामे बंद करा,विध्यार्थ्यांचे नुकसान थांबवा
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बळीराजा फाऊंडेशन ने केले आंदोलन
जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद मराठी व उर्दू शिक्षकांच्या 600 हून अधिक जागा रिक्त असल्याने विध्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.अगोदरच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतांना शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा,शिक्षकांना मूळ शाळेवर पाठवून अध्यापन कार्य करू द्या,शिक्षकांना शिकवू द्या, शिक्षकांचे शाळाबाह्य कामे बंद करा,शिक्षकांच्या रिक्त जागा भरा,तात्काळ पवित्र पोर्टल सुरु करा आदी मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा फाऊंडेशन व पालकांनी आंदोलन केले.त्यानंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर,जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन दिले.यावेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिथं जिथं रिक्त जागा जास्त प्रमाणात आहे तिथे तात्काळ व्यवस्था करा. आंदोलना दरम्यान घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलनकर्ते नारायण लोखंडे यांच्या सह पालकांना ताब्यात घेतले होते.थोड्या वेळाने सोडले.
No comments:
Post a Comment