भोकरदन/प्रतिनिधी
हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करण्याचा नवीनच प्रकार उदयास आला असून त्यात डीजे लावून रोडवर मद्यधुंद नाचणे,केक कापने असले प्रकार आपण नेहमीच पाहतोय,ऐकतोय आहेत. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवस अगदी साध्या पध्दतीने सामाजिक उपक्रम राबवून, नेञ तपासणी शिबिरे व कीर्तन महोत्सव घेऊन साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला हे स्वागतार्ह आहे असे कीर्तन महोत्सव समारोप प्रसंगी महाराष्ट्रातील कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरिकर यांनी आपल्या कीर्तनात केले. भोकरदन शहरामधील पोस्ट ऑफिस जवळील जि प कन्या शाळेच्या मैदानावर झालेल्या मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळ द्वारे आयोजित व तालुक्यातील भूमिपुत्र प्रसिद्ध कीर्तनकार हभप संतोष महाराज आढावणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कीर्तन महोत्सव समारोप कार्यक्रमास हभप विष्णु महाराज सास्ते,हभप सोरमारे महाराज व परिसरातील भजनीमंडळ आणि माजी आ सुरेशकुमार जेथलिया,कार्याध्यक्ष राजेंद्र राख,माऊली तनपुरे,उद्योजक मोहनशेठ हिवरकर,महादुशेठ राजपूत, हुकूमशेठ चुंडावत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.महोत्सव यशस्वी करण्यासाठी मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment