भोकरदन (प्रतिनिधी)केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी संसदेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना अपशब्द वापरात अपमान केला.त्याचा निषेध म्हणून भोकरदन येथे शनिवारी 21 रोजी रमाई नगर,नवे भोकरदन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अमित शाह यांचा निषेध करत त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.
दरम्यान, यावेळी तहसीलदार भोकरदन मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे संसदेत केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरून अपमान केला आहे. यामुळे आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट आहे. लोकशाही च्या मंदिरात संविधान निर्मात्याला हा कमी लेखण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला आहे. त्यांचे वक्तव्य हे संविधानिक पदालाअनुसरून नसून त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही शेवटी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ,मंगेश पगारे,नितीन म्हस्के,सिद्धार्थ सोनवणे,सागर साळवे,अमोल भोंडे,ज्ञानेश्वर शेजूळ,कृष्णा निकाळजे, विजय पगारे,निलेश हिवाळे,नितेश सावंत,गौतम वाके कर, यशोदीप राऊत,अभिजित गायकवाड, नितीन जोगदंडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment