Wednesday, October 16, 2024

विविध विकासकामासंदर्भात दिलेला शब्द आचारसंहितेपूर्वी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आ. दानवे यांचे नागरिकांनी मानले आभार


आज भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघामध्ये आ. संतोष पाटील दानवे दौऱ्यावर असताना बरंजळा साबळे येथे भोकरदन तालुक्यातील कार्लावाडी येथील कार्यकर्ते व नागरिकांनी  भेट घेतली.
कार्लावाडी येथील विविध विकासकामासंदर्भात दिलेला शब्द आचारसंहितेपूर्वी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आ. दानवे यांचे लेखी निवेदनाद्वारे आभार व्यक्त केले. त्यांच्या या अनोख्या आभार प्रदर्शनाचा नम्रपणे स्वीकार करत आ. दानवे यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....