Saturday, January 11, 2025

कब बुलबुल केंद्र स्तरीय उत्सव जि.प. प्रा.शाळा रजाळा येथे संपन्न

कब बुलबुल केंद्र स्तरीय उत्सव जि.प. प्रा.शाळा रजाळा येथे संपन्न 

---------------------------------------------
भोकरदन दि. 7 जानेवारी 2025 रोजी  प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा रजाळा केंद्र सिरसगाव मंडप  येथे केंद्रस्तरीय एक दिवशीय कब बुलबुल उत्सव 2024 - 25 उत्सव साजरा करण्यात आला. केंद्र समन्वयक श्री हरकळ सर यांनी सर्व कार्यक्रमाची धुरा सांभाळली ,कब बुलबुल उत्सवा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकर चंदवाडे ,प्रमुख पाहुणे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख श्री जिवरग सर , प्रमुख अतिथी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शंकर चंदवाडे , उपाध्यक्ष श्री.मधुकर बोर्डे, सदस्य श्री. भारत साळवे, अजय  बोर्डे, श्री. राहुल सुरडकर  , माजी सरपंच श्री. भास्कर पाटील बोर्डे  , अंगणवाडी कार्यकर्त्यां श्रीमती नवले मॅडम, श्रीमती साळवे मॅडम,  गावातील महिला व नागरिक आणि केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक संबंधित शिक्षक  केंद्रातील 19 शाळेपैकी 14 शाळेतील एकूण 168 विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत  मुख्याध्यापक श्री.राऊलवार सर  , शिक्षक श्री.पठाण सर , श्री.टेकाळे सर, श्री.नाटके सर, श्री.भोॅडणे सर यांनी केले .नंतर उत्सवाला सुरुवात करण्यात आली यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये बटाटा शर्यत, तीन पायाची शर्यत, पोता शर्यत, दोरीवरील उड्या व अल्पोपहार देण्यात आला व शेवटी स्पर्धेतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामधील उपक्रम घेऊन त्यातील क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रमानंतर विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले..श्री.डकले सर आभार प्रदर्शन केले. 
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एक दिवशीय कब बुलबुल उत्सव संपन्न झाला.

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....