Sunday, January 12, 2025

बॅडमिंटन एकेरी स्पर्धेमध्ये अमित शिवकुमार गुंटूक जिल्ह्यात प्रथम...

 बॅडमिंटन एकेरी स्पर्धेमध्ये  अमित शिवकुमार गुंटूक जिल्ह्यात प्रथम... 

जालना (प्रतिनिधी) नगर परिषद संचालनालय मुंबई व जिल्हा नगर विकास विभाग जालना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन अंबड येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धा सुरळीत पार पडल्या. तसे स्पर्धेमध्ये निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या स्पर्धे मध्ये बदनापूर नगर पंचायत कर्मचारी यांनी मा. विशाल पाटील मुख्याधिकारी न.पं. बदनापूर यांचे मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धेत अधिकारी/कर्मचारी यांनी सहभाग घेतला व  श्री. अमित शिवकुमार गुंटूक कर निरीक्षक बदनापूर यांनी बॅडमिंटन एकेरी स्पर्धेमध्ये  जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला, तसेच बॅडमिंटन दुहेरी प्रकारात सुद्धा द्वितीय येण्याचा मान मिळविला आणि टेबल टेनिस या स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकविले आहे. तसेच श्री गुंटूक यांना विभागीय स्तरावर जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.
 बदनापूर नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धे मध्ये बदनापूर नगर पंचायत अधिकारी श्री अमित शिवकुमार गुंटूक यांनी उल्लेखनिय यश मिळविल्याबद्दल त्यांचेआयुक्त श्री खांडेकर सर्व मुख्याधिकारी तसेच बदनापूरच्या नगराध्यक्षा मा. वैशालीताई जऱ्हाड , भाजपा नेते श्री विलास जऱ्हाड, न.पं. सभापती व नगरसेवक, न. पं. अधिकारी, कर्मचारी अभिनंदन करून विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धे साठी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....