कमलकिशोर जोगदंडे
आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 ला मान्य उपविभागीय अधिकारी डॉक्टर श्री दयानंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीत महिला विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षा व सुविधा कृती समिती स्थापनेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हास्तरावर माननीय जिल्हाधिकारी जालना यांनी घेतलेल्या ३०/८/२०२४ च्या बैठकीच्या अनुषंगाने तालुकास्तरावर बैठक घेऊन कृती समितीचे गठन करण्यात आले यासाठी गटशिक्षणाधिकारी तथा समितीसहसचिव सीडीएस शहागडकर यांनी समितीचा आराखडा व कार्याबद्दल परिपत्रकाप्रमाणे माहिती सांगितली भोकरदन तालुक्यातील सर्व खाजगी शासकीय आस्थापनेवरील महिला अधिकारी कर्मचारी शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी किशोरवयीन मुली महिला यांना मिळणारे सुरक्षा व सुविधेचा मुद्दा तसेच अलीकडील काळात महिला व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने अशा घटना तालुक्यात घडू नये म्हणून त्याची गंभीर दखल घेऊन जिल्हास्तराप्रमाणे तालुका स्तरावर महिलांची सुरक्षा व सुविधा कृती समिती स्थापन करण्याबाबत माहिती दिली.
माननीय विभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी समिती कृती आराखडा मांडण्यास सुचवले त्यानुसार तालुक्यातील कृती समितीवर उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणपत दराडे हे सहअध्यक्ष आहेत. समितीचे सदस्य हे तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, मुख्याधिकारी नगरपालिका भोकरदन तसेच स्वयंसेवी संस्थांचे नामनिर्देशित प्रतिनिधी या समितीवर घेण्यात आले असून तालुका संरक्षणाधिकारी हे सदस्य आहेत तर माननीय तहसीलदार डॉ. श्री. संतोष बनकर हे या समितीचे सदस्य सचिव आहेत तसेच माननीय गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे सहसचिव आहेत. समितीमार्फत शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय व इतर सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रारपेटी, महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत व सुविधां बाबतची व्यवस्था परिपूर्ण आहे किंवा नाही याची पडताळणी ही समिती करणार आहे.
तालुक्यातील महिला व मुलींच्या सुरक्षे बाबत कठोर पावले उचलली जातील असे उपविभागीय अधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉक्टर श्री दयानंद जगताप यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment