भोकरदन |संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद यांच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संतोष पाटील दानवे तिसऱ्यांदा निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित नागरी सत्कार समारंभ व इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित रहात विद्यार्थ्यांशी विविध विषयावर आ. दानवे यांनी हितगुज केले.
तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार यशाचा मार्ग निश्चित करून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन यावेळी श्री. दानवे यांनी केले. इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आज शेवटचा दिवस असल्याकारणाने सर्वजण भावूक झालेले दिसले.
यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माणिक दानवे यांच्या सह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment