Thursday, January 30, 2025

जनविकास शिक्षण संस्थेत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जनविकास शिक्षण संस्थेत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
__________________
 भोकरदन/ प्रतिनिधी
     भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्थेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वास तळेकर, सीबीएसईचे प्राचार्य विशाल इंगळे, स्टेट बोर्डाचे प्राचार्य काकासाहेब ढवळे,मुख्याध्यापक मनोज लेकुरवाळे, प्रि प्रायमरीच्या इनचार्ज सौ लता गायके, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, जनसंपर्क अधिकारी रोषण देशमुख, उपप्राचार्य एच व्ही नागरगोजे, राशिद अन्सारी,क्रीडा शिक्षक नरवाडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्ग  आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांना कॅन, टाकीत डिझेल द्या; भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

भोकरदन (प्रतिनिधी): आगामी खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले डिझेल कॅन, टाकी किंवा ...