Live News, व्हिडीओ, चालू घडामोडी, शेतकरी, अन्याय अत्याचार वाचा फोडणारे एकमेव चैनल
Thursday, November 21, 2024
Wednesday, November 20, 2024
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 64.17 टक्के मतदान
जालना: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर आणि 103-भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 755 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.17 टक्के मतदान झाले आहे. काल पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये 99-परतूर 62.06 टक्के, 100-घनसावंगी 66.57 टक्के, 101-जालना 59.12 टक्के, 102-बदनापूर 65.22 टक्के आणि 103-भोकरदन 68.15 टक्के असे एकूण सरासरी 64.17 टक्के मतदान झाले होते. मतदानाची सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंतची म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे. विधानसभा मतदार संघातील काही अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
#विधानसभा #vidhansabha #निवडणूक #मतदान
Wednesday, October 16, 2024
विविध विकासकामासंदर्भात दिलेला शब्द आचारसंहितेपूर्वी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आ. दानवे यांचे नागरिकांनी मानले आभार
Wednesday, September 25, 2024
भोकरदन तालुक्यात महिला विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षा व सुविधा कृती समितीची स्थापना
Tuesday, September 24, 2024
घरकुलांचे बांधकाम सुरु असलेल्या लाभार्थी यांना तात्काळ हाप्तेदेण्याची काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची मागणी..
जालना: भोकरदन शहरात मंजूर असलेल्या घरकुलांचे बांधकाम सुरु असल्याने लाभार्थी यांना तात्काळ हाप्ते देण्याच्या मागणी चे निवेदन काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वा खाली आज भोकरदन नगर परिषद मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांना देण्यात आले. संतोष अन्नदाते इरफान सिद्दिकी रमेश जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
प्रतिक्रिया:-राजाभाऊ देशमुख,काँग्रेस जिल्हाध्यक्ष,जालना
भोकरदन विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यासाठी प्रयत्न करणार डाॅ.पी.सी.शर्मा
भोकरदन (प्रतिनीधी) आगामी निवडणुकीत भोकरदन विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडवून घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा मध्यप्रदेशचे माजी मंत्री डॉ. पी. सी. शर्मा यांनी येथे बोलतांना दिली. महाराष्ट्र राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुक तयारीचा आढावा घेण्यासाठी जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा मध्यप्रदेशचे माजी मंञी डाॅ. पी. सी. शर्मा हे काल रविवारी जालना जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. भोकरदन येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.जालना व परभणी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी इंडिया (महाविकास) आघाडीचे उमेदवार खा.डाॅ कल्याणराव काळे जालना, व खा. बंडु जाधव, परभणी यांना भरघोस मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल पी.सी.शर्मा यांनी सर्वप्रथम सर्व जनतेचे, व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.भोकरदनचे स्थानिक उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांचा दबाव झुगारून भोकरदन- जाफराबाद तालुक्यातील जनतेने त्यांचा दारून पराभव करण्यात मोठा वाटा उचलला त्याबद्दल या दोन्ही तालुक्यातील जनतेचे देखील विशेष आभार व्यक्त करून आगामी विधानसभा निवडणुकीत भोकरदनची जागा काँग्रेस पक्षाला कशी सोडता येईल यासाठी आपण केंद्र व राज्यातील पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करून ही जागा काँग्रेसला सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शर्मा यांनी यावेळी दिली. बैठकीच्या प्रारंभी निरीक्षक शर्मा यांनी जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ निहाय आढावा घेतला. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी लोकसभा निवडणूक २०२४ आणि विधानसभा निवडणुक २०१९ मधील जालना जिल्ह्यातील विधानसभा निहाय लेखी अहवाल जालना लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान सपकाळ यांनी केले तर आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी मानले. यावेळी अनुसूचित सेलचे राष्ट्रीय पदाधिकारी जयप्रकाश नारनवरे, युवक काँग्रेसचे राहुल पाटील, ओबीसी सेलचे पंकज वाळेकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद,वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, शेख रिझवान, बदनापूर तालुकाध्यक्ष सुभाष मगरे, भोकरदन तालुकाध्यक्ष ञिबंकराव पाबळे, अनिल देशपांडे, श्रावण आक्से, इंद्रजीत देशमुख, माजी नगरसेवक शेख रफीकोदिन, संतोष अन्नदाते, रमेश जाधव, दादाराव देशमुख, विश्वासराव वाघ, गुडु कादरी,रईस शेख, अजीज पार्टी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांची या बैठकीस उपस्थिती होती. |
Friday, September 20, 2024
भोकरदन शहरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या...
भोकरदन शहरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या...
कमलकिशोर जोगदंडे
भोकरदन शहरातील रमाई नगर येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 18 सप्टेंबर 2024बुधवार रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
![]() |
मयत धम्मपाल केशवराव पगारे |
धम्मपाल केशवराव पगारे वय 40 रा. रमाई नगर नवे भोकरदन तालुका भोकरदन जि. जालना असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धम्मपाल पगारे या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे नातेवाईकांना आढळून आल्याने तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी दाखल केले असता डॉक्टर तपासून मृत्य घोषित केले.मृत्यदेह वर शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून भोकरदन येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्यात आई, एक भाऊ, पत्नी, 3बहिणी असा परिवार आहे.
दरम्यान,तरुणाच्या आत्महत्या करण्याचे कारण अध्यपही कळू शकले नाही. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून नोंद घेतली आहे.
जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम
प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....
-
भोकरदन शहरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या... कमलकिशोर जोगदंडे भोकरदन शहरातील रमाई नगर येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घट...
-
संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन ... भोकरदन प्रतिनिधी भोकरदन:संत रविदास बहुभाषिक चर्मक...
-
देशासह विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचे सदस्यत्व स्विकारुन भारतीय जनता पार्टीला पाठबळ द्या - माजी केंद्रीय मंत्री रावसाह...