Saturday, January 4, 2025

रजाळा येथे केंद्रस्तरीय कब बुलबुल उत्सवाचे आयोजन

रजाळा येथे केंद्रस्तरीय कब बुलबुल उत्सवाचे आयोजन
कमलकिशोर जोगदंडे 
भोकरदन|जालना भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय जालना व शिक्षण विभाग प्राथमिक जि. प. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७/०१/२०२५  मंगळवार रोजी भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप केंद्रातील सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळेतील नोंदणीकृत कब बुलबुल विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कब बुलबुल उत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजाळा येथे करण्यात आले आहे. या उत्सवात पोता शर्यत, बटाटा रेस, दोरीवरच्या उड्या, तीन टांगी शर्यत, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सिरसगाव मंडप केंद्रातील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळेतील नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी दिनांक ०७/०१/२०२५  मंगळवार रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत रजाळा येथे केंद्रस्तरीय एकदिवसीय कब बुलबुल उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेतील सहा कब मुले व सहा बुलबुल मुली यांनी उत्सवा दरम्यान संपन्न होणाऱ्या सर्व स्पर्धेच्या पूर्वतयारीसह सोबत दिवसभरात जेवणाचा डबा घेऊन शिक्षकांसोबत उपस्थित राहावे असे आवाहन भोकरदन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर,  शिक्षण विस्तार अधिकारी बिएल बडगे  तथा केंद्र प्रमुख डी.डी. जिवरग , केंद्रीय शाळा मुख्याध्यापक सुसर , प्रा. शाळा. रजाळा चे मुख्याध्यापक सुरेश राऊलवार, कब बुलबुल उत्सव केंद्र समन्वयक केशव हरकळ यांनी केले आहे.

Wednesday, January 1, 2025

संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन

संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन...
भोकरदन प्रतिनिधी 
भोकरदन:संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती आणि महाराष्ट्र ग्रामिण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने  संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठीच्या बैठकीचे आयोजन दिनांक 4 जानेवारी 2025 शनिवार रोजी ठिक 12 वा.स्थळ :- समितीचे संपर्क कार्यालय, पिसे कॉम्पलेक्स, बस स्टॅण्ड समोर भोकरदन उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. महादुजी सुरडकर यांनी केलेले आहे
#Santravidas 

Monday, December 23, 2024

पाणीपट्टी नगर परिषद ने माफ करावीआम आदमी पार्टी भोकरदन ची मागणी

भोकरदन शहरातील नागरिकांची मागील पाच वर्षातील पाणीपट्टी नगर परिषद ने माफ करावी आशा मागणी चे निवेदन खा.कल्याण काळे यांना आम आदमी पार्टी च्या वतीने देण्यात आले.
दरम्यान पाणीपुरवठा नियमीत झालेला नाही कोरोना काळामध्ये नागरिकांना उत्पन्न नव्हते.दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये नळाला नियमीत पाणीच सोडलेले नाही त्यामुळे तात्काळ पाणीपट्टी माफ करण्यात यावी. त्यासंबंधीचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे  व शासनाकडे तात्काळ दाखल करण्यात यावा.या मागणीसाठी आम आदमी पार्टिचे शहर अध्यक्ष महजादखान आणि शहर उपअध्यक्ष फारुकभाई आमरण उपोषण करणार असल्या बाबतचे पत्र खासदार कल्याणराव काळे  देण्यात आले.

Saturday, December 21, 2024

भोकरदन येथे वंचितच्या वतीने अमित शहा विरुद्ध जोडे मारो आंदोलन

 



भोकरदन (प्रतिनिधी)केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी संसदेत  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना अपशब्द वापरात अपमान केला.त्याचा निषेध म्हणून भोकरदन येथे शनिवारी 21 रोजी रमाई नगर,नवे भोकरदन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अमित शाह यांचा निषेध करत त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.

दरम्यान, यावेळी तहसीलदार भोकरदन मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे संसदेत केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरून अपमान केला आहे. यामुळे आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट आहे. लोकशाही च्या मंदिरात संविधान निर्मात्याला हा कमी लेखण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला आहे. त्यांचे वक्तव्य हे संविधानिक पदालाअनुसरून नसून त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही शेवटी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ,मंगेश पगारे,नितीन म्हस्के,सिद्धार्थ सोनवणे,सागर साळवे,अमोल भोंडे,ज्ञानेश्वर शेजूळ,कृष्णा निकाळजे, विजय पगारे,निलेश हिवाळे,नितेश सावंत,गौतम वाके कर, यशोदीप राऊत,अभिजित गायकवाड, नितीन जोगदंडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, November 21, 2024

भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी रिचा राठी यांची निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) म्हणुन नियुक्ती

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी रिचा राठी यांची निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) म्हणुन नियुक्ती
Bharat 24TaasNews 
जालना, दि.21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने श्रीमती रिचा राठी यांची निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) यांची नियुक्ती केली आहे.
 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार, उमेदवार यांचे प्रतिनिधी व मतदार यांना मतमोजणी विषयक काही शंका असल्यास शुक्रवार, दि. 22 नोव्हेंबर, रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत नगर परिषद मंगल कार्यालय, भोकरदन येथे उपस्थित राहून निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) श्रीमती राठी यांचे समक्ष शंकाचे निराकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी कळविले आहे.  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जालना जिल्ह्यातील टक्केवारी

Wednesday, November 20, 2024

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 64.17 टक्के मतदान



जालना: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर आणि 103-भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 755 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.17 टक्के मतदान झाले आहे. काल पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये 99-परतूर 62.06 टक्के, 100-घनसावंगी 66.57 टक्के, 101-जालना 59.12 टक्के, 102-बदनापूर 65.22 टक्के आणि 103-भोकरदन 68.15 टक्के असे एकूण सरासरी 64.17 टक्के मतदान झाले होते. मतदानाची सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंतची म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे. विधानसभा मतदार संघातील काही अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. 

#विधानसभा #vidhansabha #निवडणूक #मतदान 

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....