Wednesday, March 5, 2025

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम


प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे. यावर्षी बऱ्याचशा शाळेमध्ये विद्यार्थी ,शिक्षक,लोकसहभाग,पोषण आहार शिजवणारे कर्मचारी,पालक यांच्या सहकार्यातून परसबाग निर्मिती करण्यात आलेली आहे .त्यातील भाजीपाला व तृणधान्य हे शालेय पोषण आहारामध्ये वापरले जात आहे. पालक विद्यार्थी यांना विविध पाककृतींची व तृण धान्याची माहिती व्हावी या उद्देशाने  आज दिनांक 05/03/2025 रोजी तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा ठेवण्यात आली होती. पाककृतीचे निकष पुढीलप्रमाणे होते, फोर्टी फाईड तांदळाचा वापर व महत्व ,तृणधान्याचे महत्व व वापर, दैनंदिन आहारातील उपयोग, चव, मांडणी व नाविन्यपूर्णता इत्यादी. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व १७ केंद्रातील पोषण आहार शिजवणारे कर्मचारी सहभागी होते. त्यापैकी केंद्र जवखेडा बु अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुनगर हसनाबाद या शाळेचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक केंद्र बरंजळा साबळे,तृतीय क्रमांक केंद्र कन्या भोकरदन यांना मिळाला.  शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्पर्धक श्रीमती सुमनबाई प्रकाश रामफळे व श्रीमती सुनिताबाई शंकर तुपे यांचा गटशिक्षणाधिकारी श्री शहागडकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री यशवंत जोशी सरांनी विशेष अभिनंदन केले.या पाककृती यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री लेंभे सर , श्री साळवे सर, श्री सरकटे सर ,श्री वाढेकर सर,श्री माहोरे सर ,श्री चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Tuesday, February 25, 2025

तडेगाव व शासकिय विश्राम गृह भोकरदन ता भोकरदन येथे संत रविदास जयंती उत्साहात साजरी

तडेगाव व शासकिय विश्राम गृह भोकरदन ता भोकरदन येथे संत रविदास जयंती उत्साहात साजरी
संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहीत समिती भोकरदन जाफ्राबाद व महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ६४९वी जयंती मोठ्या उत्साहात तडेगाव ता भोकरदन जि.जालना येथील संत रविदास सांस्कृतिक सभागृहाच्या नियोजित जागेवर साजरी करण्यात आली . तत्पूर्वी गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली .
प्रसंगी सर्व समाज बांधव गावकरी व प्रमुख पाहुणे 
मा श्री ॲड . रामफळे साहेब 
श्री अभिजीत भारती सर मराठवाडा अध्यक्ष म . ग्रा बांधकाम संघ श्री संतोष बारवाल सर भोकरदन
श्री खरात साहेब
यांच्या उपस्थितीत संत रविदास स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारे समाजसेवक पुरस्कार समाजरत्न पुरस्कार कलारत्न पुरस्कार नारीरत्न पुरस्कार आदर्श शिक्षक शिक्षक रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार संबंधितांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अभिजीत भारती सर यांनी केले . मा .रामफळे  साहेबांनी संत रविदासांच्या जिवन चरित्रा विषयी व त्यांनी केलेल्या कार्या विषयी संपूर्ण माहिती सांगितली . तसेच मा अध्यक्ष श्री महादू सुरडकर यांनी समिती ने केलेली कार्य व करत असलेली कार्य यांची माहिती उपस्थितांना दिली मा बारवाल सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Thursday, January 30, 2025

जनविकास शिक्षण संस्थेत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जनविकास शिक्षण संस्थेत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
__________________
 भोकरदन/ प्रतिनिधी
     भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्थेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वास तळेकर, सीबीएसईचे प्राचार्य विशाल इंगळे, स्टेट बोर्डाचे प्राचार्य काकासाहेब ढवळे,मुख्याध्यापक मनोज लेकुरवाळे, प्रि प्रायमरीच्या इनचार्ज सौ लता गायके, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, जनसंपर्क अधिकारी रोषण देशमुख, उपप्राचार्य एच व्ही नागरगोजे, राशिद अन्सारी,क्रीडा शिक्षक नरवाडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्ग  आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद यांच्या वतीने आ. संतोष पा.दानवे यांचा सत्कार

भोकरदन |संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद यांच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संतोष पाटील दानवे  तिसऱ्यांदा निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित नागरी सत्कार समारंभ व इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित रहात विद्यार्थ्यांशी विविध विषयावर आ. दानवे यांनी हितगुज केले.
तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार यशाचा मार्ग निश्चित करून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन यावेळी श्री. दानवे यांनी केले. इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आज शेवटचा दिवस असल्याकारणाने सर्वजण भावूक झालेले दिसले.
 यावेळी भाजपाचे  स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माणिक दानवे यांच्या सह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Wednesday, January 29, 2025

शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर संचलित गजानन महाराज संस्थान तथा व्यसनमुक्ती केंद्रास आज आ. संतोष पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट

शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर संचलित गजानन महाराज संस्थान तथा व्यसनमुक्ती केंद्रास आज आ. संतोष पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट...
भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर संचलित गजानन महाराज संस्थान तथा व्यसनमुक्ती केंद्रास आज आ. संतोष पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची मनोभावे आरती व पूजा करत दर्शन घेऊन उपस्थित सर्वांशी आ. संतोष दानवे यांनी संवाद साधला. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर हे हे अध्यात्म सोबतच व्यसनमुक्तीचे एक महान कार्य करत असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांचे हे कार्य उत्तरोत्तर वाढत जावे व एक सृजनशील समाज त्यांच्या माध्यमातून घडावा हीच सदिच्छा यावेळी श्री. दानवे यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले यांच्या संस्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, महावितरण उप कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन

मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, महावितरण उप कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
भोकरदन-एमएसईडीसीएल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने १ फेब्रुवारी पासून मिटर रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात संघटनेने सर्व मिटर रीडर यांच्या स्वाक्षरी सह निवेदन महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री चेचकर यांना 28 जानेवारी रोजी देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मिटर च्या जागी स्मार्ट मीटर ( प्रीपेड मीटर) बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मीटर रिडींग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारावर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात संघटनेने शासन व महावितरण कडे वेळोवेळी उपोषण व निवेदनांच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ही शासनाने वयाच्या 60 वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी. अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे, यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही. स्मार्ट मीटर मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना मीटर रीडर कामगार राजेंद्र कुमावत, कुरेश शाह, तेजराव दांडगे, शारुख शाह, दादाराव अपार, गजानन काळे, मुकीम खान, प्रभाकर थोरात, राजेश थोरात, श्रीरंग आगलावे, एकनाथ अपार, विशाल लोखंडे, मुकीम पठाण, सुफियान शाह, अन्वर शाह, फैजान शेख, मुस्तकीम शेख, काशिफ खान, कृष्णा लोखंडे, शारुख पठाण, हरिदास किरकाडे, मनोज कोल्हे दुर्गादास लक्कस आदी उपस्थित होते.

रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न...

रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न...
जालना 
भोकरदन:भोकरदन शहरात रोहित शर्मा मित्र मंडळ  यांच्या वतीने सत्कार सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संतोष पाटील दानवे यांना फेटा बांधून शाल श्रीफळ आणि श्रीरामाची मुर्ती भेट देवून तर आ.संजनाताई जाधव यांना फेटा बांधून,शाल,श्रीफळ आणि श्रीरामाची मुर्ती आणि साडी भेट देवून  ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते सुरेश शर्मा, मा.नगरसेविका संध्याताई शर्मा, रोहित शर्मा, प्रिती शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ.संतोष पा.दानवे,आ. संजना ताई जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून जेष्ठ भाजपा कार्यकर्ते सुरेश शर्मा, रोहित शर्मा मित्र मंडळ यांचे आभार मानले. यावेळी भास्कर आबा दानवे,भूषण शर्मा,मनीष श्रीवास्तव,नानासाहेब वानखेडे यांच्या सह भोकरदन शहरातील नागरिक,महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....