Thursday, January 9, 2025

भोकरदन पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सत्कार

भोकरदन पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सत्कार 
कमलकिशोर जोगदंडे 
भोकरदन :दर्पण दिनाचे औचित्य साधून भोकरदन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या वतीने गुरुवारी 9 रोजी सकाळी शहरातील पत्रकारांचा फेटे बांधून तसेच वही पेन तसेच पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
यावेळी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी भोकरदन येथील पत्रकारांचे विशेष कौतुक करत आम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन बातम्याच्या माध्यमातून स्तुती करतात तसेच चुकीच्या कामाची दखल घेऊन कान टोचण्याचे हि काम करतात त्यामुळे काम करताना चूक झाल्यास सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. यावेळी पोलिस उप निरीक्षक पवन राजपूत , बि टी सहाणे, नेटके, विकास जाधव यांच्या सह पोलीस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तर शहरातील पत्रकारांची ही मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Tuesday, January 7, 2025

शिवूर येथील दिंडीचा माजी मंत्री दानवेच्या हस्ते सत्कार.

शिवूर येथील दिंडीचा माजी मंत्री दानवेच्या हस्ते सत्कार.
भोकरदन प्रतिनिधी 
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते शेगाव असा पायी प्रवास करणाऱ्या संत गजानन भक्तांच्या दिंडीचे भोकरदन येथे स्वागत करण्यात आले असून या दिंडीतील प्रमुख व्यक्तींचा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिऊर बंगला येथील श्री संत गजानन भक्त मधुकर गुळे, गोरख स्वामी, तुकाराम जाधव, शेषराव मुळे यांच्यासह इतर गजानन भक्तांनी सालाबाद प्रमाणे यावर्षीही शेगाव येथे पायी दिंडीने जाण्यासाठी एक जानेवारी रोजी सुरुवात केली असून 22 दिवस पायी प्रवास केल्यानंतर ही दिंडी शेगाव येथे पोहोचणार आहे . या दिंडीचे सोमवार सहा जानेवारी रोजी सायंकाळी भोकरदन शहरात आगमन झाले यानंतर ही दिंडी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने यांच्या जालना रस्त्यावरील रामसुमती कॉम्प्लेक्स येथे मुक्कामास होती मंगळवार सात जानेवारी रोजी सकाळी ही दिंडी पुन्हा मार्गस्थ होत असताना या ठिकाणी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी हजेरी लावून दिल्लीतील प्रमुख व्यक्तींचा उपरणे टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मान केला.

Saturday, January 4, 2025

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा-भोकरदनचा सभासद मेळावा संपन्न

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा-भोकरदनचा सभासद मेळावा संपन्न
कमलकिशोर जोगदंडे 
भोकरदन |देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना यांचा ग्राहक व सभासद मेळाव्याचे भोकरदन येथे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी भोकरदन चे पोलीस निरीक्षक मा. श्री. किरण बिडवे साहेब व गजानन महाराज अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकार भारती जालनाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. सतीश बापू रोकडे साहेब व सहाय्यक निबंधक संस्था भोकरदनचे सहकार अधिकारी श्री. मस्के साहेब तसेच वरिष्ठ लिपिक श्री ब्रह्मगिरी गिरी साहेब इत्यादी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच देवगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. परेश बागवे ज्येष्ठ संचालक श्री राजू भालराव श्री विकास तळेकर व संचालिका श्रीमती रेणु ताई घण हे उपस्थित होते
याप्रसंगी उपस्थित मान्यवर श्री किरण बिडवे, श्री सतीश बापू रोकडे, तसेच श्री ब्रह्मगिरी गिरी साहेब यांनी पतसंस्था या ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाचा मार्ग आहे त्यामुळे नियमित कर्ज भरणा करून सभासदांनी आपले जीवनमान उंच व्हावे व व समाजाची प्रगती करावी तसेच पालकांनी व सभासदांनी जागृत राहून आपल्या पाल्यांच्या हालचालीकडे लक्ष द्यावे व वेळीच होणाऱ्या दुर्दैवी घटना पासून स्वतःच्या कुटुंबास सावरावे असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मान्यवरांचा उपस्थित नवनिर्वाचित सल्लागार मंडळ ची स्थपना व सर्व सल्लगार समिती श्री. संतोष महाराज आढावने, श्री संजय पिसे, अॅड. श्री मयूर वडगावकर श्री योगेशजी शर्मा, श्री रंजीत डेडवाल, श्री. दादाराव नवल, श्री गजानन राऊत, श्री राजू तळेकर, श्री बाळासाहेब चोरमारे, श्री सतीश देवळे, श्री दिलीपराव दौड, श्री. नारायण साबळे, डॉ. ज्योती ताई वानखेडे, सौ. रंजनाताई देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बजरंग वरकड यांनी केले यांनी तर संचालक श्री विकास तळेकर यांनी आभार मानले कार्यक्रमास संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

रजाळा येथे केंद्रस्तरीय कब बुलबुल उत्सवाचे आयोजन

रजाळा येथे केंद्रस्तरीय कब बुलबुल उत्सवाचे आयोजन
कमलकिशोर जोगदंडे 
भोकरदन|जालना भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय जालना व शिक्षण विभाग प्राथमिक जि. प. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७/०१/२०२५  मंगळवार रोजी भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप केंद्रातील सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळेतील नोंदणीकृत कब बुलबुल विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कब बुलबुल उत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजाळा येथे करण्यात आले आहे. या उत्सवात पोता शर्यत, बटाटा रेस, दोरीवरच्या उड्या, तीन टांगी शर्यत, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सिरसगाव मंडप केंद्रातील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळेतील नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी दिनांक ०७/०१/२०२५  मंगळवार रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत रजाळा येथे केंद्रस्तरीय एकदिवसीय कब बुलबुल उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेतील सहा कब मुले व सहा बुलबुल मुली यांनी उत्सवा दरम्यान संपन्न होणाऱ्या सर्व स्पर्धेच्या पूर्वतयारीसह सोबत दिवसभरात जेवणाचा डबा घेऊन शिक्षकांसोबत उपस्थित राहावे असे आवाहन भोकरदन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर,  शिक्षण विस्तार अधिकारी बिएल बडगे  तथा केंद्र प्रमुख डी.डी. जिवरग , केंद्रीय शाळा मुख्याध्यापक सुसर , प्रा. शाळा. रजाळा चे मुख्याध्यापक सुरेश राऊलवार, कब बुलबुल उत्सव केंद्र समन्वयक केशव हरकळ यांनी केले आहे.

Wednesday, January 1, 2025

संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन

संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन...
भोकरदन प्रतिनिधी 
भोकरदन:संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती आणि महाराष्ट्र ग्रामिण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने  संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठीच्या बैठकीचे आयोजन दिनांक 4 जानेवारी 2025 शनिवार रोजी ठिक 12 वा.स्थळ :- समितीचे संपर्क कार्यालय, पिसे कॉम्पलेक्स, बस स्टॅण्ड समोर भोकरदन उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. महादुजी सुरडकर यांनी केलेले आहे
#Santravidas 

Monday, December 23, 2024

पाणीपट्टी नगर परिषद ने माफ करावीआम आदमी पार्टी भोकरदन ची मागणी

भोकरदन शहरातील नागरिकांची मागील पाच वर्षातील पाणीपट्टी नगर परिषद ने माफ करावी आशा मागणी चे निवेदन खा.कल्याण काळे यांना आम आदमी पार्टी च्या वतीने देण्यात आले.
दरम्यान पाणीपुरवठा नियमीत झालेला नाही कोरोना काळामध्ये नागरिकांना उत्पन्न नव्हते.दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये नळाला नियमीत पाणीच सोडलेले नाही त्यामुळे तात्काळ पाणीपट्टी माफ करण्यात यावी. त्यासंबंधीचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे  व शासनाकडे तात्काळ दाखल करण्यात यावा.या मागणीसाठी आम आदमी पार्टिचे शहर अध्यक्ष महजादखान आणि शहर उपअध्यक्ष फारुकभाई आमरण उपोषण करणार असल्या बाबतचे पत्र खासदार कल्याणराव काळे  देण्यात आले.

Saturday, December 21, 2024

भोकरदन येथे वंचितच्या वतीने अमित शहा विरुद्ध जोडे मारो आंदोलन

 



भोकरदन (प्रतिनिधी)केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी संसदेत  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना अपशब्द वापरात अपमान केला.त्याचा निषेध म्हणून भोकरदन येथे शनिवारी 21 रोजी रमाई नगर,नवे भोकरदन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अमित शाह यांचा निषेध करत त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.

दरम्यान, यावेळी तहसीलदार भोकरदन मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे संसदेत केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरून अपमान केला आहे. यामुळे आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट आहे. लोकशाही च्या मंदिरात संविधान निर्मात्याला हा कमी लेखण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला आहे. त्यांचे वक्तव्य हे संविधानिक पदालाअनुसरून नसून त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही शेवटी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ,मंगेश पगारे,नितीन म्हस्के,सिद्धार्थ सोनवणे,सागर साळवे,अमोल भोंडे,ज्ञानेश्वर शेजूळ,कृष्णा निकाळजे, विजय पगारे,निलेश हिवाळे,नितेश सावंत,गौतम वाके कर, यशोदीप राऊत,अभिजित गायकवाड, नितीन जोगदंडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....