भोकरदन दि. 20
Live News, व्हिडीओ, चालू घडामोडी, शेतकरी, अन्याय अत्याचार वाचा फोडणारे एकमेव चैनल
Sunday, August 20, 2023
आगामी लोकसभा, विधानसभा आणि जि.प. व पं.स निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मरगळ झटकुण कामाला लागवे - भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे
Friday, August 18, 2023
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बळीराजा फाऊंडेशन ने केले आंदोलन
शिक्षकांच्या रिक्त जागा भरा,शिक्षकांना शिकवू द्या,अशैक्षणिक कामासाठी केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करून शाळाबाह्य कामे बंद करा,विध्यार्थ्यांचे नुकसान थांबवा
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बळीराजा फाऊंडेशन ने केले आंदोलन
जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद मराठी व उर्दू शिक्षकांच्या 600 हून अधिक जागा रिक्त असल्याने विध्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.अगोदरच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतांना शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा,शिक्षकांना मूळ शाळेवर पाठवून अध्यापन कार्य करू द्या,शिक्षकांना शिकवू द्या, शिक्षकांचे शाळाबाह्य कामे बंद करा,शिक्षकांच्या रिक्त जागा भरा,तात्काळ पवित्र पोर्टल सुरु करा आदी मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा फाऊंडेशन व पालकांनी आंदोलन केले.त्यानंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर,जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन दिले.यावेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिथं जिथं रिक्त जागा जास्त प्रमाणात आहे तिथे तात्काळ व्यवस्था करा. आंदोलना दरम्यान घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलनकर्ते नारायण लोखंडे यांच्या सह पालकांना ताब्यात घेतले होते.थोड्या वेळाने सोडले.
इतर ठिकाणी वाढदिवस साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवून व कीर्तन महोत्सव घेऊन राजाभाऊ देशमुख यांचे अभिष्टचिंतन स्वागतार्ह-हभप इंदोरीकर
भोकरदन/प्रतिनिधी
हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करण्याचा नवीनच प्रकार उदयास आला असून त्यात डीजे लावून रोडवर मद्यधुंद नाचणे,केक कापने असले प्रकार आपण नेहमीच पाहतोय,ऐकतोय आहेत. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवस अगदी साध्या पध्दतीने सामाजिक उपक्रम राबवून, नेञ तपासणी शिबिरे व कीर्तन महोत्सव घेऊन साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला हे स्वागतार्ह आहे असे कीर्तन महोत्सव समारोप प्रसंगी महाराष्ट्रातील कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरिकर यांनी आपल्या कीर्तनात केले. भोकरदन शहरामधील पोस्ट ऑफिस जवळील जि प कन्या शाळेच्या मैदानावर झालेल्या मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळ द्वारे आयोजित व तालुक्यातील भूमिपुत्र प्रसिद्ध कीर्तनकार हभप संतोष महाराज आढावणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कीर्तन महोत्सव समारोप कार्यक्रमास हभप विष्णु महाराज सास्ते,हभप सोरमारे महाराज व परिसरातील भजनीमंडळ आणि माजी आ सुरेशकुमार जेथलिया,कार्याध्यक्ष राजेंद्र राख,माऊली तनपुरे,उद्योजक मोहनशेठ हिवरकर,महादुशेठ राजपूत, हुकूमशेठ चुंडावत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.महोत्सव यशस्वी करण्यासाठी मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम
प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....
-
भोकरदन शहरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या... कमलकिशोर जोगदंडे भोकरदन शहरातील रमाई नगर येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घट...
-
संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन ... भोकरदन प्रतिनिधी भोकरदन:संत रविदास बहुभाषिक चर्मक...
-
देशासह विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचे सदस्यत्व स्विकारुन भारतीय जनता पार्टीला पाठबळ द्या - माजी केंद्रीय मंत्री रावसाह...