Thursday, January 30, 2025

जनविकास शिक्षण संस्थेत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जनविकास शिक्षण संस्थेत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
__________________
 भोकरदन/ प्रतिनिधी
     भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्थेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वास तळेकर, सीबीएसईचे प्राचार्य विशाल इंगळे, स्टेट बोर्डाचे प्राचार्य काकासाहेब ढवळे,मुख्याध्यापक मनोज लेकुरवाळे, प्रि प्रायमरीच्या इनचार्ज सौ लता गायके, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, जनसंपर्क अधिकारी रोषण देशमुख, उपप्राचार्य एच व्ही नागरगोजे, राशिद अन्सारी,क्रीडा शिक्षक नरवाडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्ग  आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद यांच्या वतीने आ. संतोष पा.दानवे यांचा सत्कार

भोकरदन |संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद यांच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संतोष पाटील दानवे  तिसऱ्यांदा निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित नागरी सत्कार समारंभ व इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित रहात विद्यार्थ्यांशी विविध विषयावर आ. दानवे यांनी हितगुज केले.
तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार यशाचा मार्ग निश्चित करून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन यावेळी श्री. दानवे यांनी केले. इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आज शेवटचा दिवस असल्याकारणाने सर्वजण भावूक झालेले दिसले.
 यावेळी भाजपाचे  स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माणिक दानवे यांच्या सह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Wednesday, January 29, 2025

शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर संचलित गजानन महाराज संस्थान तथा व्यसनमुक्ती केंद्रास आज आ. संतोष पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट

शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर संचलित गजानन महाराज संस्थान तथा व्यसनमुक्ती केंद्रास आज आ. संतोष पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट...
भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर संचलित गजानन महाराज संस्थान तथा व्यसनमुक्ती केंद्रास आज आ. संतोष पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची मनोभावे आरती व पूजा करत दर्शन घेऊन उपस्थित सर्वांशी आ. संतोष दानवे यांनी संवाद साधला. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर हे हे अध्यात्म सोबतच व्यसनमुक्तीचे एक महान कार्य करत असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांचे हे कार्य उत्तरोत्तर वाढत जावे व एक सृजनशील समाज त्यांच्या माध्यमातून घडावा हीच सदिच्छा यावेळी श्री. दानवे यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले यांच्या संस्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, महावितरण उप कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन

मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, महावितरण उप कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
भोकरदन-एमएसईडीसीएल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने १ फेब्रुवारी पासून मिटर रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात संघटनेने सर्व मिटर रीडर यांच्या स्वाक्षरी सह निवेदन महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री चेचकर यांना 28 जानेवारी रोजी देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मिटर च्या जागी स्मार्ट मीटर ( प्रीपेड मीटर) बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मीटर रिडींग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारावर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात संघटनेने शासन व महावितरण कडे वेळोवेळी उपोषण व निवेदनांच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ही शासनाने वयाच्या 60 वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी. अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे, यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही. स्मार्ट मीटर मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना मीटर रीडर कामगार राजेंद्र कुमावत, कुरेश शाह, तेजराव दांडगे, शारुख शाह, दादाराव अपार, गजानन काळे, मुकीम खान, प्रभाकर थोरात, राजेश थोरात, श्रीरंग आगलावे, एकनाथ अपार, विशाल लोखंडे, मुकीम पठाण, सुफियान शाह, अन्वर शाह, फैजान शेख, मुस्तकीम शेख, काशिफ खान, कृष्णा लोखंडे, शारुख पठाण, हरिदास किरकाडे, मनोज कोल्हे दुर्गादास लक्कस आदी उपस्थित होते.

रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न...

रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न...
जालना 
भोकरदन:भोकरदन शहरात रोहित शर्मा मित्र मंडळ  यांच्या वतीने सत्कार सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संतोष पाटील दानवे यांना फेटा बांधून शाल श्रीफळ आणि श्रीरामाची मुर्ती भेट देवून तर आ.संजनाताई जाधव यांना फेटा बांधून,शाल,श्रीफळ आणि श्रीरामाची मुर्ती आणि साडी भेट देवून  ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते सुरेश शर्मा, मा.नगरसेविका संध्याताई शर्मा, रोहित शर्मा, प्रिती शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ.संतोष पा.दानवे,आ. संजना ताई जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून जेष्ठ भाजपा कार्यकर्ते सुरेश शर्मा, रोहित शर्मा मित्र मंडळ यांचे आभार मानले. यावेळी भास्कर आबा दानवे,भूषण शर्मा,मनीष श्रीवास्तव,नानासाहेब वानखेडे यांच्या सह भोकरदन शहरातील नागरिक,महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Thursday, January 23, 2025

भोकरदन येथे संत गजानन महाराज पालखीचे स्वागत

भोकरदन येथे संत गजानन महाराज पालखीचे स्वागत 
भोकरदन प्रतिनिधी
संत गजानन महाराज पालखी शूर बंगला ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील पालखीचे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले होते. 
दरम्यान भोकरदन येथील व्यवसाहिक साहेबराव बरोकर हे पहिल्या पासूननच संत गजानन महाराज यांचे सेवेकरी असून सुरवाती पासूनच ते गजानन भक्त असून ते भोकरदन शहरातून येणाऱ्या पालखीची व वारेकऱ्यांची सर्वच देखरेख करत असून राज्यातून कुठून कुठेही जाणाऱ्या पालखी तसेच पायी जाणाऱ्या वारेकऱ्यांची ते राहण्यापासून भोजना पर्यंत व निवांऱ्याची सोय घेतात गेल्या वर्षी त्यांनी राम जन्म भूमी अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण दिनी शहरात भव्य असे शुद्ध शाकाहारी भोजनालय सुरु केले होते दरम्यान त्याच दिनी त्यांच्या हॉटेल संत गजानन महाराज भोजनालय च्या वर्ष स्पुर्ती दिनी शहरातून जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे मुख्य आयोगाशी संपर्क करून श्री ची पालखी आज शहरात म मुक्कामी करून तोडी आम्हा भक्तांना सेवेची संधी द्यावी अशी विनंती केली होती दरम्यान पालखीचा मुक्काम घेऊन बरोकर यांनी आपल्या भोजनालयात सायंकाळी नातलग सह शहरातील प्रतिष्टीत लोकांना ही महा आरती व स्नेह भोजनला आमंत्रीत केले होते या वेळी सर्वांनीच श्री पालखीचे दर्शन घेऊन उत्सहात स्वागत करताना दिसून आले होते तर शहरातील सिल्लोड रोडवरील संत गजानन महाराज हॉटेल येते महा आरती संपल्या नंतर स्नेह भोजन करून वारकऱ्यांची निवांऱ्याची व्यवस्था ही शहरातील जानव्ही कॉम्प्लेक्स चे संचालक श्री किशोर जाधव यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये कारण्यात आली होती दरम्यान वारकरी मंडळी कडून बारोकर व जाधव यांचे आशीर्वादपर व्यक्त करत दुसऱ्या दिवशी दिंडीचे पुन्हा शेंगाव दिशेने वाटचाल केली होती.

वारकरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा... 
साहेबराव बारोकर. 
 धन्य होतो मी तेव्हा जेव्हा घडे हातूनी श्री ची सेवा  वारकरी सेवा तोच करी जो करे खरी ईश्वर भक्ती अश्या बोलात साहेबराव बारोकर धन्य होतं आभार व्यक्त करतात आणि मी माझे पुण्य समजतो कि गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी मी प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अश्या मंदिराचे लोकार्पण सोहळ्या दिनी माझ्या हॉटेल संत गजानन महाराज हॉटेल चे सर्व सामान्य पासून तर श्रीमंत महारतीसाठी  या हॉटेल चा शुभारंभ केला आणि गेल्या वर्षी ही याच दिनी माझ्या हॉटेल श्री ची भेट म्हणून पालखी दर्शननाचे आम्हाला भाग्य लाभले तर वर्षस्पुर्ती पूर्ण होत नाही तर श्री गजानन महाराज आमच्याभेटीला आहे हे मी माझे भाग्य समजतो तर जो पर्यंत हे आयुष्य लाभेल तो पर्यंत वारकरी असो कि कोणती ही भक्ती माझ्या समोर आली तरी माघे सरणार नाही हाचं माझ्या साठी माऊलींचा आशीर्वाद जय गजानन
#santgajanan #Bhokardan 

Saturday, January 18, 2025

स्व.ॲड.एस. डी. देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे पेरजापुर येथे उद्घघाटन

स्व.ॲड.एस. डी. देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे पेरजापुर येथे उद्घघाटन

कमलकिशोर जोगदंडे 
भोकरदन स्व. ॲड. एस. डी. देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन मौजे पेरजापुर येथे "डिजिटल भारतासाठी युवक " या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांकडुन प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी वरपे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करत शिबिरादरम्यान राबविल्या जाणाऱ्या विविध व्याख्याने व उपक्रमांची माहिती दिली.  या सर्व उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांसह शिबिरार्थींना केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी औपचारिक शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेरील समाजशिक्षण आवश्यक असते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावखेडी, तेथील समाजकारण, अर्थकारण समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. अशा अनुभवातून विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या समृद्ध होतात. शिबिरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त, समाजकार्य करण्याची संधी व प्रेरणा, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा व समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात. असे सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे घडविले जातात असे मत शिबीर  उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेईएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ.लक्ष्मीकांत शिंदे सर यांनी व्यक्त केले.
डॉ. शिंदे सर यांनी उदबोधन करताना असेही म्हटले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद युवाशक्तीमध्ये असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक स्व-विकासातून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास साधण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इतर प्रलोभनांपासून दूर राहत आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून असलेले जेईएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ.गणेश रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की आजच्या प्रगतशील युगात मोबाईल ही गरज बनली असली तरी त्याचा वापर गरजेनुसार व मर्यादित करणे आवश्यक आहे असे मत मांडत शिबिराच्या यशस्वीतेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव प्रा. रणवीरसिंह देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व विशद करत या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य प्रकारे सदुपयोग करून गावाच्या प्रगतीसाठी व स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पेरजापुर ग्रामस्थांनी शिबिर घेण्याची संधी दिल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. एस. एस. गाढे यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबिरातील प्रत्येक उपक्रमात प्रामाणिकपणे सहभाग घेत शिबिरादरम्यान त्यांच्यामध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर ही विचारांना कृतीची जोड देण्याची सुवर्णसंधी असून अशा संधीचा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मत व्यक्त केले.
पेरजापुर गावचे तरुण व उच्च शिक्षित सरपंच श्री.किशोर जाधव यांनी देखील आपल्या मनोगतातुन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व स्वनुभवासह विशद केले. 
या कार्यक्रमास पेरजापुर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्हि आर शेळके सर, साहेबराव पा. बुरंगे, राजाराम पा. जाधव, लक्ष्मण पा. बुरंगे, बाबुराव सोनटक्के, विष्णू पा. तळेकर, 
 केशवराव पा. तळेकर, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार प्रा. व्हि. एल. जाधव सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण तळेकर , प्रा. रामेश्वर पाबळे, प्रा. एस. एस. जाधव, प्रा. पि. एस. तळेकर, प्रा. जी. बी. सोनटक्के, प्रा. एस. बी. जोशी, प्रा. आर. एस. चौतमल, प्रा. एस. ए. मुळे , प्रा. एस. टी. मेल्ढे, श्री. योगेश देवडे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामेश्वर पाबळे सर यांनी केले.

जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम

प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....